कोडिंगचं कोडं

कोडिंगचं कोडं

चला, कंप्युटर प्रोग्रामिंग शिकू या!

यांच्या सहकार्याने

चला, कंप्युटर प्रोग्रामिंग शिकू या!

चला,
कंप्युटर प्रोग्रामिंग
शिकू या!
यांच्या सहकार्याने
  • प्रस्तावना
  • भाग ०१ - "Hello, World!"
  • भाग ०२ - कोडिंग का शिकायचं?
  • भाग ०३ - ब्लॉकली
  • भाग ०४ - "Hello, <तुमचं नाव>!"
  • भाग ०५ - व्हेरिएबल डिक्लरेशन
  • भाग ०६ - डेटा टाईप
  • भाग ०७ - नावात काय आहे!
  • भाग ०८ - व्हेरिएबलची किंमत ठरविणे
  • भाग ०९ - या व्हेरिएबलमधून त्या व्हेरिएबलमधे
  • भाग १० - कमेंट्स
  • भाग ११ - इनिशिअलायझिंग व्हेरिएबल्स
  • भाग १२ - मूलभूत गणिती क्रिया
  • भाग १३ - A = A + 1, असं कसं?
  • भाग १४ - जर-तर
  • भाग १५ - जर - नाही तर जर - नाही तर
  • भाग १६ – बे एके बे
  • भाग १७ – जब तक है जान
  • भाग १८ – जब तक है जान (मागील भागावरून पुढे)
  • भाग १९ – तार्किक क्रिया
  • भाग २० – स्टोन, पेपर, सिजर्स – भाग १
  • भाग २१ – स्टोन, पेपर, सिजर्स – भाग २
  • भाग २२ – व्हेरिएबल्सची मालिका
  • भाग २३ – फंक्शन
  • भाग २४ – फंक्शन – वर्तुळाचे क्षेत्रफळ
  • भाग २५ – व्हेरिएबलची व्याप्ती
  • भाग २६ – समारोप नव्हे, ही तर सुरूवात!
  • भाग २४ – फंक्शन – वर्तुळाचे क्षेत्रफळ
  • हे वाचा ...
  • हे करून बघा ...

मागच्या भागात आपण फंक्शन (function) ची तोंडओळख करून घेतली. मोठा प्रोग्राम (program) छोट्या छोट्या भागात विभागण्यासाठी, किंवा, प्रोग्राममधे त्याच त्याच कमांड्स (commands) पुन्हा पुन्हा लिहायला लागणार असतील तर त्या एकदाच लिहिण्यासाठी, फंक्शन वापरलं जातं. फंक्शनच्या वापराचे दोन टप्पे असतात. आधी ते फंक्शन लिहायचं नि मग मुख्य प्रोग्राममधून ते कॉल (call) करायचं. आज आपण फंक्शनचं एक उदाहरण बघू या.

समजा, आपल्याला सोबतच्या आकृतीत छायांकित केल्याप्रमाणे, दोन समकेंद्री वर्तुळांमधील भागाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी प्रोग्राम लिहायचा आहे. यासाठी आपल्याला काय काय करावे लागेल?

१. दोन त्रिज्या इनपुट (input) घ्याव्या लागतील.

२. बाहेरच्या वर्तुळाचे क्षेत्रफळ काढावे लागेल.

३. आतील वर्तुळाचे क्षेत्रफळ काढावे लागेल.

४. बाहेरच्या वर्तुळाच्या क्षेत्रफळातून आतील वर्तुळाचे क्षेत्रफळ वजा करून छायांकित भागाचे क्षेत्रफळ काढावे लागेल.

५. छायांकित भागाचे क्षेत्रफळ प्रिंट (print) करावे लागेल.

त्रिज्या जरी बदलली तरी दोन्ही वर्तुळांचे क्षेत्रफळ काढायचं सूत्रं तेच असणार आहे. त्यामुळे, या आकडेमोडीसाठी आपण फंक्शनचा वापर करू शकू. प्रोग्रामच्या मुख्य भागात इनपुट घेतलेली त्रिज्या इनपुट पॅरामिटर (parameter) म्हणून फंक्शनला दिली जाईल. फंक्शनच्या आत, दिलेल्या त्रिज्येच्या वर्तुळाचे क्षेत्रफळ काढले जाईल, आणि ते फंक्शनची रिटर्न व्हॅल्यू (return value) म्हणून प्रोग्रामच्या मुख्य भागाकडे पाठवले जाईल. प्रोग्रामच्या मुख्य भागातून हे फंक्शन दोनदा कॉल केले जाईल. एकदा बाहेरच्या वर्तुळाची त्रिज्या इनपुट पॅरामिटर असेल, तर एकदा आतील वर्तुळाची त्रिज्या.

।

Example : Shaded Area

Program in Blockly

Program in JavaScript