कोडिंगचं कोडं

कोडिंगचं कोडं

चला, कंप्युटर प्रोग्रामिंग शिकू या!

यांच्या सहकार्याने

चला, कंप्युटर प्रोग्रामिंग शिकू या!

चला,
कंप्युटर प्रोग्रामिंग
शिकू या!
यांच्या सहकार्याने
  • प्रस्तावना
  • भाग ०१ - "Hello, World!"
  • भाग ०२ - कोडिंग का शिकायचं?
  • भाग ०३ - ब्लॉकली
  • भाग ०४ - "Hello, <तुमचं नाव>!"
  • भाग ०५ - व्हेरिएबल डिक्लरेशन
  • भाग ०६ - डेटा टाईप
  • भाग ०७ - नावात काय आहे!
  • भाग ०८ - व्हेरिएबलची किंमत ठरविणे
  • भाग ०९ - या व्हेरिएबलमधून त्या व्हेरिएबलमधे
  • भाग १० - कमेंट्स
  • भाग ११ - इनिशिअलायझिंग व्हेरिएबल्स
  • भाग १२ - मूलभूत गणिती क्रिया
  • भाग १३ - A = A + 1, असं कसं?
  • भाग १४ - जर-तर
  • भाग १५ - जर - नाही तर जर - नाही तर
  • भाग १६ - बे एके बे
  • भाग १७ – जब तक है जान
  • भाग १८ – जब तक है जान (मागील भागावरून पुढे)
  • भाग १९ – तार्किक क्रिया
  • भाग २० – स्टोन, पेपर, सिजर्स – भाग १
  • भाग २१ – स्टोन, पेपर, सिजर्स – भाग २
  • भाग २२ – व्हेरिएबल्सची मालिका
  • भाग २३ – फंक्शन
  • भाग २४ – फंक्शन – वर्तुळाचे क्षेत्रफळ
  • भाग २५ – व्हेरिएबलची व्याप्ती
  • भाग २६ – समारोप नव्हे, ही तर सुरूवात!
  • भाग ०९ – या व्हेरिएबलमधून त्या व्हेरिएबलमधे
  • हे वाचा ...
  • हे करून बघा ...

मागील भागात आपण व्हेरिएबल (variable) मधे किंमत साठवून ठेवायचे दोन प्रकार बघितले. व्हेरिएबलमधे एक ठराविक किंमत साठवून ठेवणे, तसेच, व्हेरिएबलमधे युजर (user) ने इनपुट (input) केलेली किंमत साठवून ठेवणे. याखेरीज आपण एका व्हेरिएबलमधे दुसऱ्या एखाद्या व्हेरिएबलमधील किंमत साठवू शकतो.

आता आपण जे उदाहरण बघणार आहोत, त्यात आपण आधी “a” व “b” या व्हेरिएबल्समधे ठराविक किंमती साठवून ठेवू आणि मग “c” या व्हेरिएबलच्या मदतीने, त्यांच्या किंमतींची अदलाबदल करू.

Example : Exchange Values Stored in Two Variables

Program in Blockly

Program in JavaScript

Program Output

काय, काही येतंय का लक्षात? a ची किंमत b मधे कशी गेली? नि b ची किंमत a मधे कशी आली? आधी आपण a ची किंमत c या व्हेरिएबलमधे साठवली. मग b ची किंमत a मधे आणली. नि शेवटी c मधे साठवलेली a ची मूळची किंमत b मधे आणली.

लक्षात घ्या, जर आपण c हे व्हेरिएबल न वापरता, नुसतंच “Set a to b, Set b to a” असं लिहिलं असतं तर “Set a to b” या पहिल्या कमांड (command) नंतर आपल्या हातून “a” ची मूळ किंमत हरवली असती, आणि “Set b to a” या दुसऱ्या कमांडनंतर “a = 7 and b = 7” असं आउटपुट (output) मिळालं असतं.

आपल्या "Hello, <तुमचं नाव>!" वाल्या उदाहरणात, आपण जेव्हा "Hello"च्या पुढे x चिकटवून ते प्रिंट (print) केलं, तेव्हा "Hello, x!" असं प्रिंट न होता, x च्या जागी युजरचं नाव दिसलं होतं. म्हणजेच आपण x हे व्हेरिएबल वापरलं तेव्हा त्यातील किंमत वापरली गेली. तसेच, या उदाहरणात आपण एका व्हेरिएबलमधे साठवून ठेवलेली किंमत दुसऱ्या व्हेरिएबलमधे पाठवली.

या भागात आपण व्हेरिएबलच्या वापराचा तिसरा टप्पा शिकलो, व्हेरिएबलमधे साठवून ठेवलेली किंमत प्रोग्राममधे वापरायचा. आपण जेव्हा व्हेरिएबल "=" च्या अलिकडे न वापरता, इतर ठिकाणी वापरतो, तेव्हा आपण त्या व्हेरिएबलमधे साठवलेली किंमत वापरत असतो.