मागील भागात आपण तार्किक क्रिया हा प्रकार समजून घेण्यासाठी "स्टोन, पेपर, सिजर्स" या गेमचं उदाहरण घेतलं. या गेमच्या प्रोग्रामचे चार भाग आहेत.
१. दोन खेळाडूंचे मार्कं साठवून ठेवण्यासाठी दोन व्हेरिएबल डिक्लेअर करून, त्यात सुरूवातीस शून्य साठवून ठेवा.
२. गेमचे नियम दाखवा.
३. जोपर्यंत एका खेळाडूचे मार्कं ५ होत नाहीत, तोपर्यंत गेम खेळत रहा.
४. गेम संपला की कोण जिंकलं ते सांगा.
यातील पहिला, दुसरा व चौथा भाग आपण मागच्या भागात बघितले.
Example : Stone, Paper, Scissors
Program Output - Part 2

तिसऱ्या भागात जो लूप (loop) वापरला आहे, त्या लूपमधे किती वेळा फिरायचं हे ठरविण्यासाठीची अटही बघितली. ती दोन उपअटी "and" ह्या तार्किक क्रियेने जोडून बनलेली संयुक्त अट आहे. "ScoreOfPlayer1 < 5" व "ScoreOfPlayer2 < 5" या दोन्ही अटी true असतील तोपर्यंत प्रोग्राम लूपमधे फिरत राहील. लूपमधे फिरून प्रोग्राम काय करेल, ते आता पाहू या.
गेमच्या नियमानुसार, "if - else if - else" ही कमांड वापरून, कोणत्या खेळाडूला मार्क द्यायचा ते ठरवेल.
Example : Stone, Paper, Scissors
Program in Blockly

Program in JavaScript
