कोडिंगचं कोडं

कोडिंगचं कोडं

चला, कंप्युटर प्रोग्रामिंग शिकू या!

यांच्या सहकार्याने

चला, कंप्युटर प्रोग्रामिंग शिकू या!

चला,
कंप्युटर प्रोग्रामिंग
शिकू या!
यांच्या सहकार्याने
  • प्रस्तावना
  • भाग ०१ - "Hello, World!"
  • भाग ०२ - कोडिंग का शिकायचं?
  • भाग ०३ - ब्लॉकली
  • भाग ०४ - "Hello, <तुमचं नाव>!"
  • भाग ०५ - व्हेरिएबल डिक्लरेशन
  • भाग ०६ - डेटा टाईप
  • भाग ०७ - नावात काय आहे!
  • भाग ०८ - व्हेरिएबलची किंमत ठरविणे
  • भाग ०९ - या व्हेरिएबलमधून त्या व्हेरिएबलमधे
  • भाग १० - कमेंट्स
  • भाग ११ - इनिशिअलायझिंग व्हेरिएबल्स
  • भाग १२ - मूलभूत गणिती क्रिया
  • भाग १३ - A = A + 1, असं कसं?
  • भाग १४ - जर-तर
  • भाग १५ - जर - नाही तर जर - नाही तर
  • भाग १६ – बे एके बे
  • भाग १७ – जब तक है जान
  • भाग १८ – जब तक है जान (मागील भागावरून पुढे)
  • भाग १९ – तार्किक क्रिया
  • भाग २० – स्टोन, पेपर, सिजर्स – भाग १
  • भाग २१ – स्टोन, पेपर, सिजर्स – भाग २
  • भाग २२ – व्हेरिएबल्सची मालिका
  • भाग २३ – फंक्शन
  • भाग २४ – फंक्शन – वर्तुळाचे क्षेत्रफळ
  • भाग २५ – व्हेरिएबलची व्याप्ती
  • भाग २६ – समारोप नव्हे, ही तर सुरूवात!
  • भाग १७ – जब तक है जान
  • हे वाचा ...
  • हे करून बघा ...

प्रोग्रामला त्यातील एकाच भागात गरागरा फिरवणारी कमांड (command) म्हणजे लूप (loop). मागच्या भागात आपण सर्वात सोप्पा लूप म्हणजे फॉर (for) लूप हा प्रकार बघितला. प्रोग्रामला एका भागात किती वेळा फिरवायचं आहे हे जेव्हा आपल्याला पक्कं ठाऊक असतं तेव्हा आपण हा लूप वापरतो. आपले पाढे असतात एके पासून दाहे पर्यंत. त्यामुळे आपल्या पाढ्यांच्या उदाहरणात आपण १ ते १० आकड्यांमधे फिरणारा फॉर लूप वापरला.

कधी कधी आपल्याला प्रोग्रामने लूपमधे किती वेळा फिरायचं आहे हा नेमका आकडा माहित नसतो. एखादी पुर्वनियोजित अट पूर्ण होईपर्यंत प्रोग्रामने लूपमधे फिरणं अपेक्षित असतं. डोक्यावरून गेलं ना हे? तुमच्या ओळखीचं एक उदाहरण देऊन सांगते म्हणजे समजेल.

बहूतेक कम्प्युटर गेम्समधे, गेम सुरू होताना तुम्हाला ठराविक चान्सेस (chances) दिलेले असतात. तुम्ही तेवढे वेळा गेम खेळू शकता. हे चान्सेस तुम्ही गेमच्या फेरीत बाद व्हाल तसे नुसते कमी कमी होणार असतील तर आपल्याला फॉर लूप वापरून चाललं असतं. पण बहूतेक गेम्समधे, तुम्ही काही ठराविक मार्क्स मिळवलेत अथवा ठराविक फेऱ्या पार केल्या की तुम्हाला आणखी चान्सेस दिले जातात. म्हणजे, तुम्ही तो गेम खेळताना तुमच्या उरलेल्या चान्सेसची संख्या कमीही होऊ शकते व वाढूही शकते. जोपर्यंत ती शून्य होतं नाही तोपर्यंत तुम्ही तो गेम खेळत राहू शकता.

अशावेळी आपण रीपीट व्हाईल (repeat while) लूप वापरतो. आज आपण असाच एक छोटासा लुटूपुटूचा गेम उदाहरणादाखल घेऊया. या प्रोग्रामचे चार भाग आहेत.

१. प्रोग्रामला लागणाऱ्या व्हेरिएबल्समधे सुरूवातीच्या किंमती साठवून ठेवणे.

२. युजरला आपल्या गेमचे नियम सांगणे.

३. चान्सेस शिल्लक आहेत तोवर युजरला पुनःपुन्हा गेम खेळायला देणे.

४. चान्सेस संपले की युजरला त्याचा स्कोअर (score) काय झाला ते सांगणे.

सोबतच्या उदाहरणात यातील पहिला, दुसरा व चौथा भाग दिला आहे. तिसऱ्या भागातील लूपची कंमाड फक्तं दिली आहे. (While Chances > 0) या लूपमधे Chances ची किंमत कमी-अधिक कशी केली जाईल, ते आपण सदराच्या पुढच्या भागात बघूया.

Example : While Loop

Program in Blockly

Program Output