कोडिंगचं कोडं

कोडिंगचं कोडं

चला, कंप्युटर प्रोग्रामिंग शिकू या!

यांच्या सहकार्याने

चला, कंप्युटर प्रोग्रामिंग शिकू या!

चला,
कंप्युटर प्रोग्रामिंग
शिकू या!
यांच्या सहकार्याने
  • प्रस्तावना
  • भाग ०१ - "Hello, World!"
  • भाग ०२ - कोडिंग का शिकायचं?
  • भाग ०३ - ब्लॉकली
  • भाग ०४ - "Hello, <तुमचं नाव>!"
  • भाग ०५ - व्हेरिएबल डिक्लरेशन
  • भाग ०६ - डेटा टाईप
  • भाग ०७ - नावात काय आहे!
  • भाग ०८ - व्हेरिएबलची किंमत ठरविणे
  • भाग ०९ - या व्हेरिएबलमधून त्या व्हेरिएबलमधे
  • भाग १० - कमेंट्स
  • भाग ११ - इनिशिअलायझिंग व्हेरिएबल्स
  • भाग १२ - मूलभूत गणिती क्रिया
  • भाग १३ - A = A + 1, असं कसं?
  • भाग १४ - जर-तर
  • भाग १५ - जर - नाही तर जर - नाही तर
  • भाग १६ - बे एके बे
  • भाग १७ – जब तक है जान
  • भाग १८ – जब तक है जान (मागील भागावरून पुढे)
  • भाग १९ – तार्किक क्रिया
  • भाग २० – स्टोन, पेपर, सिजर्स – भाग १
  • भाग २१ – स्टोन, पेपर, सिजर्स – भाग २
  • भाग २२ – व्हेरिएबल्सची मालिका
  • भाग २३ – फंक्शन
  • भाग २४ – फंक्शन – वर्तुळाचे क्षेत्रफळ
  • भाग २५ – व्हेरिएबलची व्याप्ती
  • भाग २६ – समारोप नव्हे, ही तर सुरूवात!
  • भाग १९ - तार्किक क्रिया

गेल्या काही भागात आपण ज्या कमांड्स (commands) शिकलो, त्या कमांड्स दिलेल्या अटीनुसार प्रोग्रामचा कोणता भाग execute करायचा किंवा तो किती वेळा execute करायचा हे ठरवतात. यासाठी आपण तुलना करणारी चिन्हं (comparison operators) वापरली. उदाहरणार्थ, "if N1 > N2", किंवा, "while Chances > 0". पण दर वेळेला अटी एवढ्या सोप्प्या असतील असं नाही. कधी कधी अशा छोट्या छोट्या वेगवेगळ्या अटी एकत्र करून if/while मधे वापरायची किचकट अट बनवली जाते.

मुलभूत गणिती चिन्हं व तुलना करणारी चिन्हं तुम्ही एरवीसुद्धा वापरता. ती प्रोग्राममधे कशी वापरली जातात तेही आपण बघितलं. आज आपण अटी जोडायला जी चिन्हं वापरली जातात ती शिकूया. त्या आधी आपण त्यासाठी लागणारा एक डेटा टाईप बघूया.

तुम्हाला आठवत असेल, प्रोग्राममधे व्हेरिएबल (variable) वापरायच्या आधी ते डिक्लेअर (declare) करावं लागतं. काही काही प्रोग्रामिंग लॅंग्वेजेसमधे व्हेरिएबल डिक्लेअर करताना त्याचा डेटा टाईपही डिक्लेअर करावा लागतो. उदाहरणार्थ, नाव व जन्मतारीख साठवून ठेवण्यासाठी वापरली जाणारी व्हेरिएबल्स अनुक्रमे String व Date या टाईपची असतील.

एखादी अट पुर्ण होते आहे की नाही ही माहिती साठवून ठेवण्यासाठी बूलिअन (boolean) हा डेटा टाईप वापरला जातो. या डेटा टाईप मधे "बरोबर" व "चूक" (true and false) या दोनंच किंमती येतात. अट पुर्ण होते आहे की नाही हे जरी आपण एखाद्या व्हेरिएबल साठवून ठेवलं नाही तरी ज्या कमांडमधे ती अट वापरली आहे, तिथे त्याचा अर्थ "बरोबर" किंवा "चूक" असा बूलिअन डेटा टाईपनुसारंच लावला जातो. उदाहरणार्थ, "if N1 > N2", किंवा, "while Chances > 0" म्हणजेच "if ((N1 > N2) == true)", किंवा, "while ((Chances > 0) == true)".

आता आपल्याला बूलिअन स्वरूपातल्या दोन अथवा जास्तं अटी जोडायच्या असतील, तर आपल्याला काय करावे लागेल? अटी जोडायच्या दोन मुलभूत तार्किक क्रिया (logical operators) आहेत. "and" नि "or". बहूतेक प्रोग्रामिंग लॅंग्वेजेसमधे त्या अनुक्रमे && व ।। या चिन्हांनी दर्शविल्या जातात.

समजा आपल्याकडे दोन अटी आहेत. त्या अटी पुर्ण होतात की नाही ही माहिती आपण C1 व C2 या दोन बूलिअन व्हेरिएबल्समधे साठवून ठेवली आहे. आता आपल्याला C1 व C2 या दोन्हीवर आधारीत संयुक्त अट बनवायची आहे.

आपण "and" ही तार्किक क्रिया वापरली तर संयुक्त अटीचं उत्तर खालील प्रमाणे असेल.

आपण "or" ही तार्किक क्रिया वापरली तर संयुक्त अटीचं उत्तर खालील प्रमाणे असेल.

"and" वापरून जर दोन अथवा दोनापेक्षा जास्तं अटी जोडल्या, तर त्या सर्वच्या सर्व अटी true असतील, तर आपली संयुक्त अट true असेल. "or" वापरून जर दोन अथवा दोनापेक्षा जास्तं अटी जोडल्या, तर त्यापैकी कोणतीही एक अट true असेल, तर आपली संयुक्त अट true असेल.

दोनापेक्षा जास्तं अटी असतील नि त्या जोडताना आपण काही ठिकाणी "and" वापरलं नि काही ठिकाणी "or" वापरलं, तर काय होईल? बूलिअन हा डेटा टाईप, व तार्किक क्रिया आजच नव्याने शिकलोय. त्यामुळे आज एवढंच पुरे. या प्रश्नाचं उत्तर पुढच्या भागात बघूया.