कोडिंगचं कोडं

कोडिंगचं कोडं

चला, कंप्युटर प्रोग्रामिंग शिकू या!

यांच्या सहकार्याने

चला, कंप्युटर प्रोग्रामिंग शिकू या!

चला,
कंप्युटर प्रोग्रामिंग
शिकू या!
यांच्या सहकार्याने
  • प्रस्तावना
  • भाग ०१ - "Hello, World!"
  • भाग ०२ - कोडिंग का शिकायचं?
  • भाग ०३ - ब्लॉकली
  • भाग ०४ - "Hello, <तुमचं नाव>!"
  • भाग ०५ - व्हेरिएबल डिक्लरेशन
  • भाग ०६ - डेटा टाईप
  • भाग ०७ - नावात काय आहे!
  • भाग ०८ - व्हेरिएबलची किंमत ठरविणे
  • भाग ०९ - या व्हेरिएबलमधून त्या व्हेरिएबलमधे
  • भाग १० - कमेंट्स
  • भाग ११ - इनिशिअलायझिंग व्हेरिएबल्स
  • भाग १२ - मूलभूत गणिती क्रिया
  • भाग १३ - A = A + 1, असं कसं?
  • भाग १४ - जर-तर
  • भाग १५ - जर - नाही तर जर - नाही तर
  • भाग १६ – बे एके बे
  • भाग १७ – जब तक है जान
  • भाग १८ – जब तक है जान (मागील भागावरून पुढे)
  • भाग १९ – तार्किक क्रिया
  • भाग २० – स्टोन, पेपर, सिजर्स – भाग १
  • भाग २१ – स्टोन, पेपर, सिजर्स – भाग २
  • भाग २२ – व्हेरिएबल्सची मालिका
  • भाग २३ – फंक्शन
  • भाग २४ – फंक्शन – वर्तुळाचे क्षेत्रफळ
  • भाग २५ – व्हेरिएबलची व्याप्ती
  • भाग २६ – समारोप नव्हे, ही तर सुरूवात!
  • भाग २२ – व्हेरिएबल्सची मालिका
  • हे वाचा ...
  • हे करून बघा ...

व्हेरिएबल (variable) म्हणजे काय व ते आपण प्रोग्राम (program) मधे कसं वापरतो ते आता तुम्हाला नीट समजलं आहे. व्हेरिएबलला आपल्या प्रोग्रामनुसार योग्य नाव देऊन त्यात आपण आवश्यक ती किंमत साठवून ठेवतो. मोठ्या मोठ्या प्रोग्राममधे वापरायला लागणाऱ्या वेगवेगळ्या किंमती साठवून ठेवायला प्रत्येकी वेगवेगळी व्हेरिएबल्स वापरली तर व्हेरिएबल्सची संख्या प्रचंड वाढेल व प्रोग्रामिंग खूप किचकट होईल. असं होऊ नये म्हणून डेटा स्ट्रक्चर्स (data structures) वापरली जातात. आज आपण सर्वात सोप्पं डेटा स्ट्रक्चर शिकणार आहोत.

समजा, तुम्हाला शाळेत एकूण पाच विषय आहेत. एका विद्यार्थ्याचे त्या पाच विषयातील मार्क्स इनपुट (input) केले असता, एकूण मार्क्स आउटपुट (output) करणारा प्रोग्राम तुम्हाला लिहायचा आहे. तुम्ही म्हणाल, सोप्पंय, नि पाच विषयांसाठी पाच, नि एकूण मार्कांसाठी एक, अशी सहा व्हेरिएबल्स वापरून, खालील प्रकारे आकडेमोड करणारा प्रोग्राम पटकन लिहून टाकाल.

Total = Marks1 + Marks2 + Marks3 + Marks4 + Marks5;

समजा, पाच ऐवजी दहा विषय असतील, तर आणखी पाच व्हेरिएबल्स वाढवाल. पण आपण अशी किती व्हेरिएबल्स वाढवत बसणार! त्यापेक्षा, अशा वेळी आपण अॅरे (array) अथवा लिस्ट (list) वापरतो. यात आपण एकावेळी अनेक किंमती साठवून ठेऊ शकतो.

व्हेरिएबलला आपण नाव देतो, तसं या अॅरे प्रकारच्या व्हेरिएबललाही आपण नाव देतो. व्हेरिएबलच्या डेटा टाईप प्रमाणे, या अॅरेलाही आपण डेटा टाईप देतो. याखेरीज, अॅरेसाठी आपल्याला आणखी एक माहिती पुरवावी लागते. ती म्हणजे, त्याची लांबी. व्हेरिएबल डिक्लरेशन करताना कंम्प्युटर त्याच्या मेमरीत जागा राखून ठेवतो, तशी या अॅरे साठीही ठेवतो. पण ॲरेच्या बाबतीत ही जागा जास्तं असते. दिलेल्या डेटाटाईपच्या, अॅरेच्या लांबीइतक्या वेगवेगळ्या किंमती साठवून ठेवता येतील, इतकी मोठी. यातील प्रत्येक किंमत वापरण्यासाठी, या जागेच्या प्रत्येक भागाला अनुक्रमांक दिला जातो. या क्रमांकाला इंडेक्स (index) म्हणतात. काही प्रोग्रामिंग लॅंग्वेजेसमधे हा अनुक्रमांक शुन्यापासून सुरू होतो, तर काहींमधे एकपासून.

आपल्या मार्कांच्या उदाहरणात, पाच विषयांचे मार्क्स साठवून ठेवायला, आपण खालील प्रकारचा अॅरे डिक्लेअर करू.

int Marks[5];

बहूतेक प्रोग्रामिंग लॅंग्वेजेसमधे चौकोनी कंस वापरून अॅरेची लांबी दर्शविली जाते. अॅरेमधे साठवलेल्या किंमतींपैकी ठराविक अनुक्रमांकाची किंमत दर्शविण्यासाठीसुद्धा चौकोनी कंस वापरला जातो. उदाहरणार्थ, पहिल्या विषयातील मार्क्स वापरण्यासाठी, नुसतं Marks हे व्हेरिएबल न वापरता, अनुक्रमांक शुन्यापासून सुरू होत असेल तर, Marks[0] असं लिहावं लागतं.

फॉर लूप (for loop) वापरून आपण अॅरेमधे साठवलेल्या सगळ्या किंमती एकेक करून घेऊ शकतो.

In JavaScript

for (i = 1; i <= Marks.length; i++) {

  Total = Total + Marks[i-1];

}

In Blockly

count with i from 1 to length of Marks by 1

do

  Set Total to Total + in list Marks get # i

अशाप्रकारे अॅरे वापरून प्रोग्राम लिहिल्यास, पाच ऐवजी दहा विषय झाले, तर आपल्याला व्हेरिएबल्स वाढवायला लागणार नाहीत. अॅरेची लांबी बदलून चालेल.

Example : Array / List

Program in Blockly

Program Output