कोडिंगचं कोडं

कोडिंगचं कोडं

चला, कंप्युटर प्रोग्रामिंग शिकू या!

यांच्या सहकार्याने

चला, कंप्युटर प्रोग्रामिंग शिकू या!

चला,
कंप्युटर प्रोग्रामिंग
शिकू या!
यांच्या सहकार्याने
  • प्रस्तावना
  • भाग ०१ - "Hello, World!"
  • भाग ०२ - कोडिंग का शिकायचं?
  • भाग ०३ - ब्लॉकली
  • भाग ०४ - "Hello, <तुमचं नाव>!"
  • भाग ०५ - व्हेरिएबल डिक्लरेशन
  • भाग ०६ - डेटा टाईप
  • भाग ०७ - नावात काय आहे!
  • भाग ०८ - व्हेरिएबलची किंमत ठरविणे
  • भाग ०९ - या व्हेरिएबलमधून त्या व्हेरिएबलमधे
  • भाग १० - कमेंट्स
  • भाग ११ - इनिशिअलायझिंग व्हेरिएबल्स
  • भाग १२ - मूलभूत गणिती क्रिया
  • भाग १३ - A = A + 1, असं कसं?
  • भाग १४ - जर-तर
  • भाग १५ - जर - नाही तर जर - नाही तर
  • भाग १६ - बे एके बे
  • भाग १७ – जब तक है जान
  • भाग १८ – जब तक है जान (मागील भागावरून पुढे)
  • भाग १९ – तार्किक क्रिया
  • भाग २० – स्टोन, पेपर, सिजर्स – भाग १
  • भाग २१ – स्टोन, पेपर, सिजर्स – भाग २
  • भाग २२ – व्हेरिएबल्सची मालिका
  • भाग २३ – फंक्शन
  • भाग २४ – फंक्शन – वर्तुळाचे क्षेत्रफळ
  • भाग २५ – व्हेरिएबलची व्याप्ती
  • भाग २६ – समारोप नव्हे, ही तर सुरूवात!
  • भाग ०६ - डेटा टाईप

मागच्या भागात आपण व्हेरिएबलच्या वापरातील पहिला टप्पा शिकलो, व्हेरिएबल डिक्लरेशन (Variable Declaration) चा. एखादं व्हेरिएबल वापरायच्या आधी त्या प्रोग्रामला सांगायचं की आपण अमुक एका नावाचं व्हेरिएबल वापरणार आहोत. म्हणजे, त्यानुसार कंप्युटर त्याच्या मेमरी (memory) मधे एक जागा राखून ठेवतो, नि त्या जागेला आपण दिलेलं नाव देतो. जेव्हा आपण त्या नावाच्या व्हेरिएबलमधे काही माहिती साठवायला जातो, तेव्हा ती, मेमरीमधील त्या राखून ठेवेलेल्या भागात साठवली जाते.

जावास्क्रिप्ट सारख्या भाषांमधे, व्हेरिएबल डिक्लेअर करताना नुसतं "var x;" असं व्हेरिएबलचं नाव डिक्लेअर केलं तरी पुरतं. परंतु इतर काही भाषांमधे, व्हेरिएबलच्या नावाबरोबर त्याचा डेटा टाईप (data type) पण डिक्लेअर करावा लागतो. व्हेरिएबलचा डेटा टाईप म्हणजे त्या व्हेरिएबलमधे आपण काय प्रकारची माहिती ठेवणार आहोत ते. उदाहरणार्थ, आपण त्या व्हेरिएबलमधे व्यक्तिचं नाव साठवून ठेवणार आहोत, की वय साठवून ठेवणार आहोत, की जन्मतारीख साठवून ठेवणार आहोत, याप्रमाणे त्याचा टाईप बदलेलं.

वेगवगळ्या भाषांमधे या टाईप्सची वेगवेगळी नावं असतात. उदाहरणार्थ, जावा (Java) मधे पुर्णांकासाठी int, अपुर्णांकांसाठी float, मजकूरासाठी String, तारखेसाठी java.util.Date, इत्यादी. व्हिज्युअल बेसिक (Visual Basic) मधे पु्र्णांकासाठी Integer, अपुर्णांकांसाठी Double, मजकूरासाठी String, तारखेसाठी Date, इत्यादी. या भाषांमधे व्हेरिएबल डिक्लेअर करताना नुसतं जावास्क्रिप्ट भाषेतल्या सारखं var लिहून पुरत नाही. त्या भाषेतील टाईपनुसार व्हेरिएबल डिक्लेअर करावं लागतं. सोबतच्या आकृतीत याचे काही नमुने दिले आहेत.

Variable Declarations in JavaScript

Variable Declarations in Java

Variable Declarations in Visual Basic

या वेगवेगळ्या भाषांच्या वेगवेगळ्या तऱ्हांनी गोंधळून जाऊ नका. सध्या फक्त एवढं लक्षात ठेवा की:

१. बहूतेक भाषांमधे प्रोग्राममधे व्हेरिएबल वापरण्याआधी ते डिक्लेअर करावं लागतं.

२. आपण जी भाषा वापरत असू, त्या भाषेच्या पद्धतीप्रमाणे, टाईपसकट किंवा टाईपशिवाय, ते डिक्लेअर करायचं असतं.