मागच्या भागात आपण “जर-तर” ही कमांड (command) शिकलो. “जर दिलेली अट पूर्ण होत असेल तर असं कर, नाही तर तसं कर” असं या कमांडचं स्वरूप असतं. आज एकापेक्षा जास्त अटी तपासणारं एक उदाहरण बघूया. यात आपण समानता तपासणाऱ्या "=" ह्या चिन्हाप्रमाणे असमानता तपासणारं ">" हे चिन्हं सुद्धा वापरलं आहे.
Example : If - Else If – Else
Program in Blockly

Program in JavaScript

दिलेल्या दोन आकड्यांची "च्या पेक्षा मोठा" अशी तुलना करणारं ">" हे चिन्हं तर तुम्हाला माहित असेलंच. वरील उदाहरणात ">" हे चिन्हं वापरून "N1ची किंमत N2 च्या किंमतीपेक्षा मोठी आहे का" ही अट आपण तपासली आहे. N1ची किंमत मोठी असल्यास ही अट पूर्ण होऊन, त्यानुसार मेसेज (message) दिला जाईल. N1ची किंमत मोठी नसल्यास, तपासलेली अट पूर्ण न झाल्याने, त्यानुसार मेसेज दिला जाईल.
दिलेल्या दोन आकड्यांची तुलना करणारी चिन्हं खालीलप्रमाणे:
== | समान | N1ची किंमत व N2 ची किंमत समान आहेत का |
!= or <> | असमान | N1ची किंमत व N2 ची किंमत असमान आहेत का |
> | च्या पेक्षा मोठा | N1ची किंमत N2 च्या किंमतीपेक्षा मोठी आहे का |
>= | च्या पेक्षा मोठा अथवा समान | N1ची किंमत N2 च्या किंमतीपेक्षा मोठी आहे का अथवा त्या समान आहेत का |
< | च्या पेक्षा लहान | N1ची किंमत N2 च्या किंमतीपेक्षा लहान आहे का |
<= | च्या पेक्षा लहान अथवा समान | N1ची किंमत N2 च्या किंमतीपेक्षा लहान आहे का अथवा त्या समान आहेत का |