कोडिंगचं कोडं

कोडिंगचं कोडं

चला, कंप्युटर प्रोग्रामिंग शिकू या!

यांच्या सहकार्याने

चला, कंप्युटर प्रोग्रामिंग शिकू या!

चला,
कंप्युटर प्रोग्रामिंग
शिकू या!
यांच्या सहकार्याने
  • प्रस्तावना
  • भाग ०१ - "Hello, World!"
  • भाग ०२ - कोडिंग का शिकायचं?
  • भाग ०३ - ब्लॉकली
  • भाग ०४ - "Hello, <तुमचं नाव>!"
  • भाग ०५ - व्हेरिएबल डिक्लरेशन
  • भाग ०६ - डेटा टाईप
  • भाग ०७ - नावात काय आहे!
  • भाग ०८ - व्हेरिएबलची किंमत ठरविणे
  • भाग ०९ - या व्हेरिएबलमधून त्या व्हेरिएबलमधे
  • भाग १० - कमेंट्स
  • भाग ११ - इनिशिअलायझिंग व्हेरिएबल्स
  • भाग १२ - मूलभूत गणिती क्रिया
  • भाग १३ - A = A + 1, असं कसं?
  • भाग १४ - जर-तर
  • भाग १५ - जर - नाही तर जर - नाही तर
  • भाग १६ - बे एके बे
  • भाग १७ – जब तक है जान
  • भाग १८ – जब तक है जान (मागील भागावरून पुढे)
  • भाग १९ – तार्किक क्रिया
  • भाग २० – स्टोन, पेपर, सिजर्स – भाग १
  • भाग २१ – स्टोन, पेपर, सिजर्स – भाग २
  • भाग २२ – व्हेरिएबल्सची मालिका
  • भाग २३ – फंक्शन
  • भाग २४ – फंक्शन – वर्तुळाचे क्षेत्रफळ
  • भाग २५ – व्हेरिएबलची व्याप्ती
  • भाग २६ – समारोप नव्हे, ही तर सुरूवात!
  • भाग १२ – मूलभूत गणिती क्रिया
  • हे वाचा ...
  • हे करून बघा ...

मागच्या भागात आपण कंप्युटरवरच्या क्रिकेटच्या गेमचं उदाहरण घेतलं होतं. CurrentInnings, OversBowled, TotalRuns, WicketsFallen, ही व्हेरिएबल्स अनुक्रमे 1, 0, 0, 0, या किंमतींनी इनिशिअलायझ केली होती. पण जसा हा गेम पुढे सरकेल तशा आपल्याला या व्हेरिएबल्सच्या किंमती बदलायला लागतील. त्यासाठी आपल्या प्रोग्रामला आकडेमोड करायला लागेल. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या मूलभूत गणिती क्रिया तुम्हाला तर माहितंच आहेत. त्या आपल्या प्रोग्रामकडून कशा करून घ्यायच्या ते आज बघूया.

बेरीज व वजाबाकीसाठी आपली नेहेमीचीच "+" आणि "-" ही चिन्हं वापरली जातात. इंग्रजी "X" अक्षराबरोबर गोंधळ होऊ नये म्हणून गुणाकारासाठी "*" हे चिन्हं वापरलं जातं. भागाकारासाठी, भाज्याच्या खाली रेघ मारून खालच्या ओळीवर भाजक कसा लिहीता येणार, म्हणून भाज्याच्या पुढे तिरपी रेघ ("/") देऊन त्याच ओळीवर भाजक लिहीला जातो. घातांक लिहिताना, मुख्य आकड्याच्या जरा वरती नि छोट्या अक्षरात लिहिण्याऐवजी, "^" हे चिन्हं वापरलं जातं. या चिन्हाला कॅरेट (caret) म्हणतात. (हे चिन्हं तुम्हाला कंप्युटरच्या कीबोर्डवर 6 या आकड्याच्या वरती सापडेल.)

Example : Basic Maths

Program in Blockly

Program in JavaScript

ही सगळी आकडेमोड होते "=" च्या उजवीकडे. आकडेमोड करून आलेलं उत्तर ज्या व्हेरिएबलमधे साठवून ठेवायचं, ते व्हेरिएबल "=" च्या अलीकडे लिहिलं जातं.

एका पदावलीत बरीच चिन्हं असतील तर त्यातलं आधी काय सोडवायचं नि नंतर काय, याचे गणितातले नियम तर तुम्हाला माहितंच असतील (BODMAS Rule). प्रोग्रामिंग लॅंग्वेजेस सुद्धा हाच अनुक्रम (हायरारकी/hierarchy) वापरतात. Brackets : कंस, Orders : घात, Division/Multiplication : भागाकार, गुणाकार, Addition/Subtraction: बेरीज, वजाबाकी. एकाच पदावलीत भागाकार, गुणाकार दोन्ही असतील, किंवा बेरीज, वजाबाकी दोन्ही असतील, तर ते डावीकडून उजवीकडे या क्रमाने सोडवले जातात.

गणितात आपण वेगवेगळ्या प्रकारचे कंस वापरतो. गोल कंस उर्फ पॅरेनथेसिस (parenthese), चौकोनी कंस उर्फ ब्रॅकेट्स (brackets) नि महिरपी कंस उर्फ ब्रेसेस् (braces). प्रोग्रामिंगमधे सुद्धा हे तिनही कंस वापरले जातात. पण गणिती चिन्हांचा अनुक्रम ठरवायला मात्र फक्तं गोल कंस वापरतात. चौकोनी अथवा महिरपी कंस कधी कसे वापरायचे ते त्यांचा संदर्भ येईल तेव्हा सांगेनच.

Example : Hierarchy of Operators

Program in Blockly

Program in JavaScript

आकडे नि गणिती चिन्हं जरी तिच असली तरी कंसाच्या वापरामुळे पदावलीचं उत्तर कसं बदललं ते आलं ना तुमच्या लक्षात?