या सदराच्या आधीच्या एका भागात बघितलेल्या "Hello, <तुमचं नाव>!" या उदाहरणात, आपण युजर (user) च्या नावासाठी x हे व्हेरिएबल (variable) वापरलं होतं. व्हेरिएबल म्हणजे काय, हे तुमच्या परिचयाच्या बीजगणितातील x ही संज्ञा वापरून समजावता यावं, केवळ म्हणून त्या व्हेरिएबलला x हे नाव दिलं होतं. प्रत्यक्षात शक्यतो ते व्हेरिएबल आपण कशासाठी वापरणार आहोत, त्यानुसार अर्थपूर्ण नाव देणं सोईचं असतं. म्हणजे, युजरचं नाव साठवून ठेवणाऱ्या व्हेरिएबलला, x या नावाच्या ऐवजी username हे नाव द्यायला पाहिजे.
कंप्युटरला व्हेरिएबलच्या नावांनी काहीच फरक पडत नाही. समजा, आपण Int टाईपचं व्हेरिएबल "username" या नावाने डिक्लेअर केलं नि त्यात युजरचं वय साठवून ठेवलं, तसेच, String टाईपचं व्हेरिएबल "age" या नावाने डिक्लेअर केलं नि त्यात युजरचं नाव साठवून ठेवलं. तर त्याने कंप्युटरचा काहीच गोंधळ होणार नाही. मात्र आपल्याला जर "Aparna is 10 years old." असं लिहायचं असेल, तर ती प्रिंट कमांड लिहिताना आपलाच गोंधळ होईल.
आपण जेव्हा काही लिहितो, तेव्हा आपण सुवाच्य अक्षर काढायला बघतो. कारण म्हणजे ते नीट वाचता येतं. त्याप्रमाणे आपला प्रोग्राम सुवाच्य होण्यासाठी काही सवयी लावून घ्याव्या लागतात. व्हेरिएबलला अर्थपूर्ण नावं देणं ही त्यातलीच एक. कोडिंग शिकताना आपण जे प्रोग्राम्स लिहतो ते छोटे छोटे असतात. त्यातील व्हेरिएबल्स पण मोजकीच असतात. त्यामुळे व्हेरिएबलला अर्थपूर्ण नाव देण्याची गरज तुम्हाला आत्ता जाणवणार नाही. पण जेव्हा बरीच व्हेरिएबल्स असलेले मोठे मोठे प्रोग्राम्स लिहाल, तेव्हा या सवयीचं महत्त्व कळेल.
व्हेरिएबलला नाव देताना, ते अर्थपूर्ण असण्याखेरीज, आणखी एका गोष्टीचं भान ठेवायला लागतं. ते म्हणजे आपण ज्या भाषेत कोडिंग करत आहोत. त्या भाषेतील कमांड्स (commands) आपण व्हेरिएबलचं नाव म्हणून वापरू शकत नाही. वरील उदाहरणातील जावास्क्रिप्टमधील प्रोग्राममधे "var" हा शब्द व्हेरिएबल डिक्लेअर करण्यासाठी वापरला आहे, त्यामुळे तो शब्द व्हेरिएबलचं नाव म्हणून वापरता येणार नाही. अशा शब्दांना त्या भाषेतील कीवर्ड्स (keywords) म्हणतात. व्हेरिएबलला नाव देताना कीवर्ड्स वापरता येत नाहीत.
Example: Variable Declarations - अयोग्यप्रकारे
Program in Blockly

Program in JavaScript

Program Output – अपेक्षित

Program Output – चुकलेलं

Example: Variable Declarations - योग्यप्रकारे
Program in Blockly

Program in JavaScript

व्हेरिएबल डिक्लरेशन हा झाला व्हेरिएबलच्या वापराचा पहिला टप्पा. यानंतर आपण व्हेरिएबलच्या वापराचे पुढचे टप्पे शिकूया. पण, ते पुढच्या भागांत!