कोडिंगचं कोडं

कोडिंगचं कोडं

चला, कंप्युटर प्रोग्रामिंग शिकू या!

यांच्या सहकार्याने

चला, कंप्युटर प्रोग्रामिंग शिकू या!

चला,
कंप्युटर प्रोग्रामिंग
शिकू या!
यांच्या सहकार्याने
  • प्रस्तावना
  • भाग ०१ - "Hello, World!"
  • भाग ०२ - कोडिंग का शिकायचं?
  • भाग ०३ - ब्लॉकली
  • भाग ०४ - "Hello, <तुमचं नाव>!"
  • भाग ०५ - व्हेरिएबल डिक्लरेशन
  • भाग ०६ - डेटा टाईप
  • भाग ०७ - नावात काय आहे!
  • भाग ०८ - व्हेरिएबलची किंमत ठरविणे
  • भाग ०९ - या व्हेरिएबलमधून त्या व्हेरिएबलमधे
  • भाग १० - कमेंट्स
  • भाग ११ - इनिशिअलायझिंग व्हेरिएबल्स
  • भाग १२ - मूलभूत गणिती क्रिया
  • भाग १३ - A = A + 1, असं कसं?
  • भाग १४ - जर-तर
  • भाग १५ - जर - नाही तर जर - नाही तर
  • भाग १६ - बे एके बे
  • भाग १७ – जब तक है जान
  • भाग १८ – जब तक है जान (मागील भागावरून पुढे)
  • भाग १९ – तार्किक क्रिया
  • भाग २० – स्टोन, पेपर, सिजर्स – भाग १
  • भाग २१ – स्टोन, पेपर, सिजर्स – भाग २
  • भाग २२ – व्हेरिएबल्सची मालिका
  • भाग २३ – फंक्शन
  • भाग २४ – फंक्शन – वर्तुळाचे क्षेत्रफळ
  • भाग २५ – व्हेरिएबलची व्याप्ती
  • भाग २६ – समारोप नव्हे, ही तर सुरूवात!
  • भाग ०२ - कोडिंग का शिकायचं?

मागच्या भागात आपण गेम्स्, मीडिआ प्लेअर, पेंट, वर्ड, या सॉफ्टवेअर्सचा उल्लेख केला होता. कंप्युटर सॉफ्टवेअर्स म्हणजे एखादं ठराविक काम करण्याची कंप्युटरमधे असलेली सोय. बाहेरगावच्या ट्रेनचं ऑनलाईन रिझर्व्हेशन करायला आपण जी वेबसाईट वापरतो, तशा वेबसाईट्स म्हणजे पण एका प्रकारचे सॉफ्टवेअर्स. आणि फक्त कंप्युटर कशाला, मोबाईल फोनमधली ॲप्स् म्हणजेसुद्धा आणखी एका प्रकारची सॉफ्टवेअर्सच असतात.

गेम खेळताना अमुक एक बटण दाबलं की अमुक एक ॲक्शन कर, एखादं टार्गेट पार केलं की स्कोअर वाढवून दाखव. पेंट वापरताना, रंग ओतला की कर्सर (cursor), म्हणजेच माऊसचा पॉइंटर, ज्या भागात आहे तो भाग निवडलेल्या रंगाने भरून टाक. ट्रेनच्या नंबरवर क्लिक केलं की त्या ट्रेनचं वेळापत्रक दाखव. हे सगळं असं करायचं ते त्या सॉफ्टवेअर्सना कसं कळतं? तर ते काम प्रोग्रामिंगचं, म्हणजेच कोडिंगचं. वेगवेगळ्या कमांड्स पासून हे प्रोग्राम्स बनलेले असतात. या कमांड्स साठी लागणारं प्रोग्रामिंग कोण्या एखाद्या व्यक्तिने केलेलं असतं. एकदा का प्रोग्राम लिहून झाला की त्यानुसार ते सॉफ्टवेअर वागत असतं नि आपण सांगितलेल्या गोष्टी करतं.

सॉफ्टवेअर्सचा आपल्याभोवती इतका सुळसुळाट असला तरी प्रोग्रामिंग बद्दल आपल्याला विशेष माहिती नसते. कारण आपण तयार सॉफ्टवेअर्स वापरत असतो. मी नववीच्या सुट्टीत जेव्हा पहिल्यांदा कंप्युटर शिकले ना, तेव्हा काही मोजक्याच कंपन्यांमधे, काही ठराविक कामांपुरताच कंप्युटरचा वापर असायचा. त्यामुळे कंप्युटर शिकायचं म्हणजे प्रोग्रामिंग शिकणंच असायचं.

त्यानंतर कंप्युटर जसजसे आकाराने छोटे, किंमतीने स्वस्तं, वापरायला सोपे होत गेले तसा त्यांचा वापर वाढला. आपल्या रोजच्या वापरासाठी, करमणूकीसाठी, तसेच, वेगवेगळ्या ऑफिसेस मधल्या वेगवेगळ्या कामांसाठी, सॉफ्टवेअर्स उपलब्ध झाली. मग कंप्युटर शिकायचं म्हणजे आपल्या व्यवसायाशी संबंधित सॉफ्टवेअर्स कशी वापरायची हेच शिकलं जाऊ लागलं. उदाहरणार्थ, आर्किटेक्ट्स किंवा सिव्हिल/मेकॅनिकल इंजिनीअर्सनी टेक्निकल ड्रॉइंग्स काढण्यासाठी ऑटोकॅड (AutoCAD) शिकायचं, कॉमर्स स्टुडंट्सनी टॅली (Tally) शिकायचं, इत्यादी. यामुळे प्रोग्रामिंग मागे पडलं.

आता कंप्युटरचं स्वरूप बदलतंय. डेस्कटॉप, लॅपटॉप, याखेरीज स्मार्टफोन्स, टॅबलेट पी.सी., हे सुद्धा कंप्युटरची काही कामं करायला वापरले जाऊ शकतात. फोनवरून आपण इमेल / व्हिडिओ कॉल करू शकतो. मी हे लिहिते आहे, ते सुद्धा माझा आयपॅड (iPad) वापरून. टी.व्ही., वॉशिंग मशिनसारखी यंत्रपण आपण काही प्रमाणात प्रोग्राम करू शकतो. प्रोग्राम्स, प्रोग्राम करता येणारी यंत्र नि त्यांचा वापर करणारे, यांची संख्या जशी वाढत जाणार, तशी प्रत्येक यंत्राच्या, प्रत्येक वापरकर्त्याच्या गरजेनुसार लागणाऱ्या सॉफ्टवेअर्सची संख्या वाढत जाणार.

सॉफ्टवेअर्सच्या या वाढीव गरजेला तोंड द्यायला यापुढे येऊ घातलेली सॉफ्टवेअर्स ही कस्टमायझेबल (customizable) असतील. कस्टमायझेबल म्हणजे एखाद्या सॉफ्टवेअरमधे काही विशिष्ट गोष्टी करण्याची सोय आधीच असेल नि त्या व्यतिरीक्त आणखी काही गोष्टी करण्याची सोय तुम्ही स्वतः तुमच्या गरजेप्रमाणे त्यात करू शकाल. आत्ताही काही सॉफ्टवेअर्स तशीच आहेत. टॅली या सॉफ्टवेअरचं उदाहरण घेतलं, तर अकाऊंटींगची मूळ कामं करण्याच्या सोयी त्यात आहेत, पण त्या माहितीवर आधारीत एखादा रिपोर्ट एखाद्या सी.ए.ला एखाद्या विशिष्ट स्वरूपात पाहिजे असेल, तर तो ते स्वतःच बनवून घेऊ शकतात. या अशा कस्टमायझेबल सॉफ्टवेअर्सच्या वापरासाठी आपल्याला पुन्हा प्रोग्रामिंग शिकण्याकडे वळावं लागेल. प्रोग्रामिंगमधे अगदी तज्ज्ञ नाही, तरी त्यातील जुजबी ज्ञान असणं सगळ्यांनाच आपापल्या क्षेत्रात फायद्याचं ठरेल.