मागील भागात आपण रीपीट व्हाईल लूप (repeat while loop) शिकण्यासाठी एका लुटूपुटूच्या गेमचं उदाहरण घेतलं. या गेमच्या प्रोग्रामचे चार भाग आहेत.
१. प्रोग्रामला लागणाऱ्या व्हेरिएबल्समधे सुरूवातीच्या किंमती साठवून ठेवणे.
२. युजरला आपल्या गेमचे नियम सांगणे.
३. चान्सेस शिल्लक आहेत तोवर युजरला पुनःपुन्हा गेम खेळायला देणे.
४. चान्सेस संपले की युजरला त्याचा स्कोअर (score) काय झाला ते सांगणे.
यातील पहिला, दुसरा व चौथा भाग आपण मागच्या भागात बघितले. पहिल्या भागात Chances व Score ह्या व्हेरिएबल्समध्ये (variables) अनुक्रमे 5 व 0 या किमती साठवून ठेवल्या. दुसऱ्या व चौथ्या भागाचं आउटपुट (output) पुढीलप्रमाणे होतं :
Example : While Loop
Program Output - Part 2
Program Output - Part 4
तिसऱ्या भागात रीपीट व्हाईल लूप वापरावा लागेल, एवढं आपण मागच्या भागात बघितलं. आज हा लूप व त्या लूपच्या आतील कमांड्स (commands) बघू.
रीपीट व्हाईल कमांड सोबत “While Chances > 0” अशी अट दिली आहे. याचा अर्थ प्रोग्रामच्या सुरुवातीला Chances ह्या व्हेरिएबलमध्ये साठवलेली 5 ही किंमत 0 होईपर्यंत लूपच्या आतील कमांड्स परत परत एक्झिक्युट (execute) केल्या जातील. समजा, लूपच्या आतील कमांड्सनी Chances ह्या व्हेरिएबलची किंमत बदललीच नाही तर काय होईल? काय होणार! आपला प्रोग्राम या लूपमधेच अडकून, तिथेच गरगर फिरत बसेल. लूपमधून बाहेरच पडणार नाही! त्यामूळे लूप लिहिताना लूपची अट काय आहे व आपला प्रोग्राम लूपमधून बाहेर पडेल ना हे लक्षात घ्यावं लागतं. आपल्या आजच्या लूपमधे Chances ह्या व्हेरिएबलची किंमत आपल्याला कमी कमी करत न्यावी लागेल.
Condition of the Loop
Commands within the Loop
लूपच्या प्रत्येक फेरीत म्हणजे प्रत्येक आयटरेशनमधे (iteration) प्रोग्राम पुढील गोष्टी करेल :
१. व्हाईल लूपच्या अटीची, “While Chances > 0”, पुर्तता होत असेल तर लूपच्या आत जाईल, नाही तर, लूपच्या बाहेर पडेल.
२. युजरला (user) त्याचा स्कोअर काय आहे व त्याचे किती चान्सेस शिल्लक आहेत हे सांगून, त्याला फासा फेकायला सांगेल.
३. फासा फेकून युजरला किती पॉईंट्स मिळाले, यासाठी १ ते ६ मधील एक रँडम नंबर (random number) निवडेल.
४. हे पॉईंट्स युजरच्या स्कोअरमधे मिळवेल.
५. युजरला ६ पॉईंट्स मिळाले नसतील तर त्याचा एक चान्स कमी करेल.
६. पुन्हा लूपच्या सुरुवातीला जाईल.
Program Output - Part 3
Program in JavaScript