कोडिंगचं कोडं

कोडिंगचं कोडं

चला, कंप्युटर प्रोग्रामिंग शिकू या!

यांच्या सहकार्याने

चला, कंप्युटर प्रोग्रामिंग शिकू या!

चला,
कंप्युटर प्रोग्रामिंग
शिकू या!
यांच्या सहकार्याने
  • प्रस्तावना
  • भाग ०१ - "Hello, World!"
  • भाग ०२ - कोडिंग का शिकायचं?
  • भाग ०३ - ब्लॉकली
  • भाग ०४ - "Hello, <तुमचं नाव>!"
  • भाग ०५ - व्हेरिएबल डिक्लरेशन
  • भाग ०६ - डेटा टाईप
  • भाग ०७ - नावात काय आहे!
  • भाग ०८ - व्हेरिएबलची किंमत ठरविणे
  • भाग ०९ - या व्हेरिएबलमधून त्या व्हेरिएबलमधे
  • भाग १० - कमेंट्स
  • भाग ११ - इनिशिअलायझिंग व्हेरिएबल्स
  • भाग १२ - मूलभूत गणिती क्रिया
  • भाग १३ - A = A + 1, असं कसं?
  • भाग १४ - जर-तर
  • भाग १५ - जर - नाही तर जर - नाही तर
  • भाग १६ - बे एके बे
  • भाग १७ – जब तक है जान
  • भाग १८ – जब तक है जान (मागील भागावरून पुढे)
  • भाग १९ – तार्किक क्रिया
  • भाग २० – स्टोन, पेपर, सिजर्स – भाग १
  • भाग २१ – स्टोन, पेपर, सिजर्स – भाग २
  • भाग २२ – व्हेरिएबल्सची मालिका
  • भाग २३ – फंक्शन
  • भाग २४ – फंक्शन – वर्तुळाचे क्षेत्रफळ
  • भाग २५ – व्हेरिएबलची व्याप्ती
  • भाग २६ – समारोप नव्हे, ही तर सुरूवात!
  • भाग ०८ - व्हेरिएबलची किंमत ठरविणे

मागील काही भागांत आपण व्हेरिएबल (variable) चा वापर शिकायला सुरूवात केली. त्यातला व्हेरिएबल डिक्लरेशन (declaration) हा पहिला टप्पा बघितला. त्यापुढचा टप्पा आहे, व्हेरिएबलमधे किंमत साठवून ठेवायचा (Set value of a variable). आपण व्हेरिएबल डिक्लेअर केलं, कंप्युटरने त्यासाठी जागा राखून ठेवली, तरी ती जागा तेव्हा रिकामीच असते. त्या जागेत आपल्याला आपल्या प्रोग्रामच्या गरजेनुसार हवी ती किंमत साठवून ठेवायला लागते. आपल्या "Hello, <तुमचं नाव>!" वाल्या उदाहरणात आपण x नावाचं व्हेरिएबल वापरलं होतं, ज्यात आपण युजर (user) चं नाव साठवून ठेवलं होतं.

व्हेरिएबलमधे किंमत साठवून ठेवण्यासाठी, बहुतेक भाषांमधे आपल्या परिचयाचं गणितातलं "=" हे चिन्हं वापरतात. चिन्हं जरी तेच असलं तरी, व्हेरिएबलमधे किंमत साठवून ठेवण्याच्या बाबतीत या चिन्हाचा अर्थ थोडा वेगळा असतो. गणित विषयात, "=" हे चिन्हं समानता दाखवायला वापरतात. जेव्हा आपण प्रोग्राम मधे username = "Aparna" असं लिहू, तेव्हा त्याचा अर्थ, username is equal to "Aparna", असा नसतो. त्याचा अर्थ, "=" च्या नंतर दिलेली "Aparna" ही किंमत, "=" च्या आधी दिलेल्या username या व्हेरिएबलमधे साठवून ठेव, असा होतो.

व्हेरिएबलमधे किंमत साठवून ठेवण्यासाठी, "=" च्या आधी, ज्या व्हेरिएबलमधे किंमत साठवून ठेवायची आहे त्या व्हेरिएबलचं नाव लिहायचं नि "=" च्या उजवीकडे, त्या व्हेरिएबलमधे जी किंमत साठवून ठेवायची ती लिहायची.

लुटूपुटूच्या ब्लॉकली (Blockly) या भाषेत व्हेरिएबलमधे किंमत साठवून ठेवण्यासाठी आपण "=" च्या ऐवजी “Set <variable name> to” चा ठोकळा वापरणार आहोत. या ठोकळ्याच्या उजवीकडच्या खाचेत व्हेरिएबलच्या किंमतीचा ठोकळा आणून बसवायचा.

Set value of a variable in Blockly

Set value of a variable in JavaScript

वरील उदाहरणात आपण username या व्हेरिएबलमधे "Aparna" हे एक ठराविक नाव साठवून ठेवलं आहे. पण व्हेरिएबलमधे किंमत साठवून ठेवताना, दरवेळेस आपण त्यात अशी ठराविक किंमत साठवून ठेवू असे नाही. तुम्हाला ठाऊक आहेच, आपण त्यात युजरने इनपुट केलेली किंमत देखील साठवू शकतो. आपल्या "Hello, <तुमचं नाव>!" वाल्या उदाहरणात, आपल्याला x या व्हेरिएबलमधे युजरकडून इनपुट घेतलेलं युजरचं नाव साठवून ठेवायचं होतं. त्यामुळे आपण "Set x to" च्या उजवीकडच्या खाचेत प्रॉम्प्ट (prompt) हा ठोकळा बसवला होता. त्यानुसार प्रॉम्प्ट या कमांडचं आउटपुट (output), x या व्हेरिएबलमधे साठवलं गेलं.

Example : Set value of a variable from User Input

Command in Blockly

Command in JavaScript