कोडिंगचं कोडं

कोडिंगचं कोडं

चला, कंप्युटर प्रोग्रामिंग शिकू या!

यांच्या सहकार्याने

चला, कंप्युटर प्रोग्रामिंग शिकू या!

चला,
कंप्युटर प्रोग्रामिंग
शिकू या!
यांच्या सहकार्याने
  • प्रस्तावना
  • भाग ०१ - "Hello, World!"
  • भाग ०२ - कोडिंग का शिकायचं?
  • भाग ०३ - ब्लॉकली
  • भाग ०४ - "Hello, <तुमचं नाव>!"
  • भाग ०५ - व्हेरिएबल डिक्लरेशन
  • भाग ०६ - डेटा टाईप
  • भाग ०७ - नावात काय आहे!
  • भाग ०८ - व्हेरिएबलची किंमत ठरविणे
  • भाग ०९ - या व्हेरिएबलमधून त्या व्हेरिएबलमधे
  • भाग १० - कमेंट्स
  • भाग ११ - इनिशिअलायझिंग व्हेरिएबल्स
  • भाग १२ - मूलभूत गणिती क्रिया
  • भाग १३ - A = A + 1, असं कसं?
  • भाग १४ - जर-तर
  • भाग १५ - जर - नाही तर जर - नाही तर
  • भाग १६ - बे एके बे
  • भाग १७ – जब तक है जान
  • भाग १८ – जब तक है जान (मागील भागावरून पुढे)
  • भाग १९ – तार्किक क्रिया
  • भाग २० – स्टोन, पेपर, सिजर्स – भाग १
  • भाग २१ – स्टोन, पेपर, सिजर्स – भाग २
  • भाग २२ – व्हेरिएबल्सची मालिका
  • भाग २३ – फंक्शन
  • भाग २४ – फंक्शन – वर्तुळाचे क्षेत्रफळ
  • भाग २५ – व्हेरिएबलची व्याप्ती
  • भाग २६ – समारोप नव्हे, ही तर सुरूवात!
  • भाग १३ – A = A + 1, असं कसं?
  • हे वाचा ...
  • हे करून बघा ...

गेल्या भागात आपण प्रोग्रामिंग लॅंग्वेजमधील (programming language) मूलभूत गणिती क्रिया शिकलो. त्यात आपण आकडेमोडीची जी उदाहरणं बघितली त्यात "="च्या डावीकडे जे व्हेरिएबल (variable) असायचं ते "="च्या उजवीकडील पदावलीत वापरलेलं नव्हतं. पण समजा आपण एकच व्हेरिएबल "="च्या डावीकडेही वापरलं नि "="च्या उजवीकडील पदावलीतही. तर काय होईल?

तुमच्या गणिताच्या तासाला तुम्हाला खालील समीकरणे दिली:

A = A + B

A = A x B

आणि जर तुम्हाला यातील B ची किंमत विचारली, तर तुम्ही पटकन उत्तर द्याल. B ची किंमत असेल, अनुक्रमे 0 आणि 1.

पण समजा, एखाद्या प्रोग्राममधे (program) तुम्ही ह्या कमांड्स (commands) बघितल्या, तर B ची किंमत अनुक्रमे 0 आणि 1 असेलच असे नाही. त्या प्रोग्राममधे B ची किंमत असेल, त्या प्रोग्राममधील आधीच्या कमांड्सनी B या व्हेरिएबल जी किंमत साठवून ठेवली आहे ती!

प्रोग्राममधे गणिती क्रिया करताना "=" या चिन्हाचा अर्थ समीकरणाप्रमाणे डावी बाजू व उजवी बाजू समान आहेत हे दर्शवायला होत नाही. त्याचा अर्थ, "=" च्या उजवीकडे दिलेली आकडेमोड करून आलेलं उत्तर, "=" च्या अलीकडे असलेल्या व्हेरिएबलमधे साठवून ठेव, असा होतो.

त्यामूळे प्रोग्राममधील A = A + B ही कमांड रन (run) होईल तेव्हा A व B या व्हेरिएबल्समधे त्यावेळेस ज्या किंमती असतील त्यांची बेरीज केली जाईल, व आलेले उत्तर A या व्हेरिएबलमधे साठवलं जाईल.

कम्प्युटरवरील क्रिकेटच्या गेममधे पाचव्या क्रमांकाच्या फलंदाजाने एका बॉलवर 3 रन्स काढल्या, तर त्याने काढलेल्या रन्स, तसेच, एकूण रन्स, या दोन व्हेरिएबल्सच्या किंमती आपल्याला सोबतच्या उदाहरणात दाखविल्याप्रमाणे बदलायला लागतील.

Example : Update Score

Program in Blockly

Program in JavaScript

Program Output

समजा हा फलंदाज बाद झाला, तर बाद झालेल्या फलंदाजांची संख्या ज्या व्हेरिएबलमधे साठवून ठेवली आहे, त्याच्या किंमतीत खालील प्रमाणे बदल केला जाईल:

WicketsFallen = WicketsFallen + 1

एखाद्या व्हेरिएबलची किंमत एकाने वाढवायची किंवा एकाने कमी करायची वेळ बहूतेक प्रोग्राम्समधे बऱ्याच ठिकाणी येत असते. त्यामुळे त्यासाठी दरवेळी A = A + 1 किंवा A = A - 1 असं लिहिण्याऐवजी काही प्रोग्रामिंग लॅंग्वेजेस मधे या कमांड्सचं संक्षिप्त रूप वापरलं जातं. ते A++ किंवा A-- अशा प्रकारचं असतं. आपल्या लुटूपुटूच्या ब्लॉकली भाषेत जरी आपण ते वापरणार नसलो, तरी तुम्हाला माहित असावं म्हणून सांगून ठेवलं.