कोडिंगचं कोडं

कोडिंगचं कोडं

चला, कंप्युटर प्रोग्रामिंग शिकू या!

यांच्या सहकार्याने

चला, कंप्युटर प्रोग्रामिंग शिकू या!

चला,
कंप्युटर प्रोग्रामिंग
शिकू या!
यांच्या सहकार्याने
  • प्रस्तावना
  • भाग ०१ - "Hello, World!"
  • भाग ०२ - कोडिंग का शिकायचं?
  • भाग ०३ - ब्लॉकली
  • भाग ०४ - "Hello, <तुमचं नाव>!"
  • भाग ०५ - व्हेरिएबल डिक्लरेशन
  • भाग ०६ - डेटा टाईप
  • भाग ०७ - नावात काय आहे!
  • भाग ०८ - व्हेरिएबलची किंमत ठरविणे
  • भाग ०९ - या व्हेरिएबलमधून त्या व्हेरिएबलमधे
  • भाग १० - कमेंट्स
  • भाग ११ - इनिशिअलायझिंग व्हेरिएबल्स
  • भाग १२ - मूलभूत गणिती क्रिया
  • भाग १३ - A = A + 1, असं कसं?
  • भाग १४ - जर-तर
  • भाग १५ - जर - नाही तर जर - नाही तर
  • भाग १६ – बे एके बे
  • भाग १७ – जब तक है जान
  • भाग १८ – जब तक है जान (मागील भागावरून पुढे)
  • भाग १९ – तार्किक क्रिया
  • भाग २० – स्टोन, पेपर, सिजर्स – भाग १
  • भाग २१ – स्टोन, पेपर, सिजर्स – भाग २
  • भाग २२ – व्हेरिएबल्सची मालिका
  • भाग २३ – फंक्शन
  • भाग २४ – फंक्शन – वर्तुळाचे क्षेत्रफळ
  • भाग २५ – व्हेरिएबलची व्याप्ती
  • भाग २६ – समारोप नव्हे, ही तर सुरूवात!
  • भाग १६ – बे एके बे
  • हे वाचा ...
  • हे करून बघा ...

दिलेल्या अटीनुसार प्रोग्राम (program) मधील हा भाग करायचा की तो भाग करायचा असा निर्णय घेणारी "जर-तर" ही कमांड आपण शिकलो. आज आपण प्रोग्रामला प्रोग्राममधील एकच भाग पुनःपुन्हा करायला लावणारी कमांड शिकणार आहोत.

प्रोग्रामला त्यातील एकाच भागात गरागरा फिरवणाऱ्या कमांड्स ना लूप (loop) म्हणतात. या लूप्सचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यातील सर्वात सोप्पा लूप म्हणजे फॉर (for) लूप. प्रोग्रामला एका भागात किती वेळा फिरवायचं आहे हे जेव्हा आपल्याला पक्कं ठाऊक असतं तेव्हा आपण हा लूप वापरतो. आपल्या लुटूपुटूच्या ब्लॉकली भाषेत त्याला "count with" loop म्हटलं आहे.

समजा, आपल्याला आपल्या प्रोग्रामला एखादा पाढा म्हणायला लावायचं आहे. आता आपण जसे पाढे पाठ केले आहेत तसे तर आपण त्या प्रोग्रामकडून पाठ करून नाही घेऊ शकत. पण फॉर लूप वापरून आपण त्याला दिलेल्या आकड्याचा दहा वेळा गुणाकार करायला सांगू शकतो. आणि दहा वेळा गुणाकार करताना गुणक १ पासून सुरूवात करून, दरवेळेस १ ने वाढवत न्यायला ही सांगू शकतो.

Example : For Loop

Program in Blockly

Program in JavaScript

सोबतच्या उदाहरणातील "count with" लूपमधे i हे एक व्हेरिएबल आहे व तीन आकडे आहेत. पहिला आकडा हे दर्शवितो की प्रोग्रामने या लूपच्या फेऱ्या घालणे सुरू करण्याच्या वेळी i या व्हेरिएबलची किंमत काय असेल. दुसरा आकडा हे दर्शवितो की i या व्हेरिएबलची किंमत कुठपर्यंत पोहोचली की प्रोग्रामने या लूपच्या फेऱ्या घालणे थांबवायचे. तिसरा आकडा हे दर्शवितो की प्रत्येक फेरीस i या व्हेरिएबलची किंमत कितीने वाढत जाईल.

हे उदाहरण दिलेल्या अंकाचा पाढा प्रिंट करत असल्याने यातील आकडे अनुक्रमे १, १० व १ असे आहेत व लूपच्या आत, दिलेल्या संख्येला i ने गुणून आलेला गुणाकार प्रिंट केला आहे. समजा तुम्हाला १०० पर्यंतच्या सम संख्या प्रिंट करायच्या असतील, तर हेच आकडे अनुक्रमे २, १०० व २ असे होतील. नि युजरला आकडा न विचारताच, लूपच्या आत i ची किंमतच प्रिंट केली जाईल. काय? येतंय ना लक्षात? नसेल आलं लक्षात, तर या सदराच्या संकेतस्थळावर जाऊन प्रयत्न करून बघा!