कोडिंगचं कोडं

कोडिंगचं कोडं

चला, कंप्युटर प्रोग्रामिंग शिकू या!

यांच्या सहकार्याने

चला, कंप्युटर प्रोग्रामिंग शिकू या!

चला,
कंप्युटर प्रोग्रामिंग
शिकू या!
यांच्या सहकार्याने
  • प्रस्तावना
  • भाग ०१ - "Hello, World!"
  • भाग ०२ - कोडिंग का शिकायचं?
  • भाग ०३ - ब्लॉकली
  • भाग ०४ - "Hello, <तुमचं नाव>!"
  • भाग ०५ - व्हेरिएबल डिक्लरेशन
  • भाग ०६ - डेटा टाईप
  • भाग ०७ - नावात काय आहे!
  • भाग ०८ - व्हेरिएबलची किंमत ठरविणे
  • भाग ०९ - या व्हेरिएबलमधून त्या व्हेरिएबलमधे
  • भाग १० - कमेंट्स
  • भाग ११ - इनिशिअलायझिंग व्हेरिएबल्स
  • भाग १२ - मूलभूत गणिती क्रिया
  • भाग १३ - A = A + 1, असं कसं?
  • भाग १४ - जर-तर
  • भाग १५ - जर - नाही तर जर - नाही तर
  • भाग १६ – बे एके बे
  • भाग १७ – जब तक है जान
  • भाग १८ – जब तक है जान (मागील भागावरून पुढे)
  • भाग १९ – तार्किक क्रिया
  • भाग २० – स्टोन, पेपर, सिजर्स – भाग १
  • भाग २१ – स्टोन, पेपर, सिजर्स – भाग २
  • भाग २२ – व्हेरिएबल्सची मालिका
  • भाग २३ – फंक्शन
  • भाग २४ – फंक्शन – वर्तुळाचे क्षेत्रफळ
  • भाग २५ – व्हेरिएबलची व्याप्ती
  • भाग २६ – समारोप नव्हे, ही तर सुरूवात!
प्रस्तावना

हवामानातील बदलाचा अभ्यास असो, की अंतराळ मोहीमा, अशा कोणत्याही विज्ञान शाखांमधला संगणकाचा सहभाग महत्त्वाचा आहे. विज्ञानाखेरीज इतर क्षेत्रातही, त्या त्या क्षेत्रातील कामांसाठी संगणक वापरला जातो. कामाव्यतिरिक्त, निव्वळ करमणूकीसाठी केला जाणारा संगणकाचा वापरही दिवसेंदिवस वाढतो आहे. संगणकाचं स्वरूपही आकुंचन पावत, स्मार्टफोनच्या रूपात आपल्या मुठीत सामावलंय.

संगणकाचं महत्त्व लक्षात घेता, आपल्या शालेय अभ्यासक्रमात संगणक या विषयाचा समावेश केला गेला आहे. तरी त्याचा भर संगणक या यंत्राची माहिती, व संगणक वापरणे, यावर आहे. या दोहोंमधला घटक आहे प्रोग्रामिंग उर्फ कोडिंग (programming/coding). या भागाचा आपल्या अभ्यासक्रमात समावेश नाही. त्यामुळे, संगणक एवढी वेगवेगळी कामं कसा करतो, हे आपल्यासाठी एक कोडंच असतं.

संगणकाचा वाढता वापर लक्षात घेता पुढील काही वर्षात, आपण कोणत्याही क्षेत्रात काम करायचं ठरवलं तरी, कोडिंगचं जुजबी ज्ञान आपल्याला असणं आवश्यक ठरेल. त्यामुळे आपल्याला पडलेलं हे कोडिंगचं कोडं सोडवायचा हा प्रयत्न .. रविवारच्या लोकसत्तेतील बालमैफलमधल्या या सदराच्या माध्यमातून ..